…म्हणून दापोलीतली शिवसेनेची सत्ता गेली राष्ट्रवादीकडे!

…म्हणून दापोलीतली शिवसेनेची सत्ता गेली राष्ट्रवादीकडे!

रत्नागिरीतील दापोली आणि मंडणगड नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर खेड-दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार योगेश कदम यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवत शिवसेनेच्याच नेत्यांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खच्चीकरण करायचे आणि राष्ट्रवादीचे बळ वाढवायचे अशी छुपी निती आमच्याच काही नेत्यांची होती. असा गंभीर आरोप योगेश कदम यांनी केला आहे.

राज्याच्या ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. तर मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट झाली आहे.

दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीचा १४ जागांवर विजय झाला, यामध्ये शिवसेना ६ आणि राष्ट्रवादीचा ८ जगावांर विजय झाला. तर नाराज शिवसेना अपक्ष २ व भाजप १ जागेवर विजय झाला आहे. तर मंडणगड नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीचा ७, शिवसेना अपक्ष ८ तर अन्य २ जागांवर इतर अपक्ष विजयी झाले आहेत. या निकालामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मुलाने नाराजी जाहीर करत मनातील सल बोलून दाखवली आहे.

हे ही वाचा:

इंडिया गेटवर नेताजींचा भव्य पुतळा….पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

बापरे!! मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर दररोज ११ हजार वाहने टोल देतच नाहीत!

अमोल कोल्हेंबाबत शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मतभेद

ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांचं निधन

नेमके काय म्हणाले योगेश कदम?

महाविकास आघाडी करायची असेल तर ज्याची ताकद जशी आहे तसेच जागांचे वाटप झाले पाहिजे असं माझ मत होते. ते जर का झाले असते तर मला महाविकास आघाडी मान्य होती, पण तसे झाले नाही. पूर्णपणे शिवसेनेचे खच्चीकरण करायचं, राष्ट्रवादीचे बळ वाढवायचे ही छुपी नीती दुर्दैवाने आमच्या काही नेत्यांची होती आणि ती दुर्दैवाने दापोलीमध्ये यशस्वी झाली. पण त्यामुळे असे घडले की पाच वर्ष शिवसेनेची सत्ता ज्या दापोली नगरपंचायतीमध्ये होती, ती आता शिवसेनेकडे नसून राष्ट्रवादीकडे गेलेली आहे, त्यामुळे फायदा राष्ट्रवादीचा झालेला आहे. असा धक्कादायक दावा योगेश कदम यांनी केला आहे.

Exit mobile version