महापूराच्या नावाखाली शिवसेनेची नवी वसुली सुरु

महापूराच्या नावाखाली शिवसेनेची नवी वसुली सुरु

माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. चिपळूणमध्ये आलेल्या महापुराच्या मुद्द्यावरुन मुंबईत शिवसेनेनं नवी वसुली मोहीम सुरु केल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केलाय. मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी त्याबाबत माहिती दिली आहे. शिवसेना सध्या महापुराच्या नावाखाली मुंबईकरांकडे वेगळी वर्गणी मागत आहे. ही एकप्रकराची शिवसेनेची नवीन वसुली मोहीम आहे, असा घणाघाती आरोप निलेश राणे यांनी केलाय. त्याचबरोबर शिवसेनेला कधीपर्यंत पोसणार असा सवालही निलेश राणे यांनी मुंबईकरांना विचारलाय.

दुसरीकडे निलेश राणे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केलीय. आदित्य ठाकरेंना पाहून बाळासाहेबांची शिवसेना आठवते का? असा सवाल त्यांनी केलाय. आदित्य ठाकरेंना बघून सुशांतसिंग हत्या प्रकरण आठवतं. बाटली आणि ग्लास आठवतो, अशा शब्दात निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्ला चढवला. जिथं बाळासाहेब नाहीत तिथल्या पक्षात कसली श्रद्धा, असा सवालही त्यांनी केलाय. आमची श्रद्धा बाळासाहेबांच्या पायाशी होती. शिवसेनेनं ते काही शिल्लक ठेवलं नाही. शिवसेना भवनात आता सर्व अमराठी लोक दिसतील. तिथे आलेले सर्व बिलिंगसाठी आलेले असतात. मातोश्रीवर बॅग घेऊन आलेल्या माणसालाच प्रवेश मिळत असल्याचा घणाघातही निलेश राणे यांनी यावेळी केलाय.

हे ही वाचा:

…तर मुख्यमंत्री उद्या कदाचित गेट वे ऑफ इंडियाचंसुद्धा लोकार्पण करतील

पोलिस कुटुंबियांना पाठवलेल्या नोटीसा रद्द करा

फ्लिपकार्टला ईडीचा दणका

‘त्या’ बसचालकाविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, चिपळूणमधील पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतल्याचा आरोपही काल करण्यात येत होता. त्यावर बोलताना ‘गिव्ह अँड टेक‘ चा अर्थ एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने द्या. ठाकरे सरकारचा ‘गिव्ह अँड टेक‘ म्हणजे एक दिवस द्या आणि दुसऱ्या दिवशी तेच परत घ्या. दरडग्रस्तांची क्रूर चेष्टा केली आहे ठाकरे सरकारने. ठाकरे सरकारने नीचपणा जगात शिल्लक ठेवला नाही, सगळा वापरला, अशी टिकाही निलेश राणे यांनी केली होती.

Exit mobile version