मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही

“मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठे?” असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, असंही ते म्हणाले.

माहीममध्ये राजा बढे चौकात भाजपाच्या कार्यालयाचं उद्घटान करण्यात आलं. यावेळी नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी असो कि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम असो त्यासाठीची आमची ही तयारी आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं नितेश राणे म्हणाले.

भाजपच्या कार्यालयासमोर काय आहे याचा आम्हाला काय फरक पडतो? कोणतं भवन चवन असेल तर काय फरक पडतो? ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही. ते कलेक्शन ऑफिस झालं आहे. आम्हाला भवन फवनचा फरक पडत नाही. मुंबईत आम्ही कुठेही काम करू शकतो. बंदी आहे का? असा सवाल त्यांनी केला.

हे ही वाचा:

पीव्ही सिंधू पराभूत होऊनही पदकाची आशा?

पुण्यात चारनंतर आराम

एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?

जैश ए मोहम्मदच्या ‘या’ दहशतवाद्याला कंठस्नान

मुंबईत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर आमचा जोर आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे कार्यालय स्थापन केलं आहे. आता आम्ही मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात जाणार. महापालिका निवडणुका येईपर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत आमचे काम सुरूच राहील, असं सांगतानाच हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं सांगितलं जातं. जिथे पाणी लोकांना मिळत नाही, तो बालेकिल्ला. जिथे कचऱ्याचं साम्राज्य आहे, तो बालेकिल्ला. जिथे धुळीचं साम्राज्य आहे, तो बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवू आणि उद्या हाच बालेकिल्ला आमचा करू, असंही ते म्हणाले.

Exit mobile version