समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेने गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतान उद्यान हे नाव ठेवण्याच्या प्रस्तावास भाजपाने कडाडून विरोध केलेला आहे. पण या प्रस्तावाला विरोध न करता उलट तो प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठविण्यात आल्यामुळे शिवसेनेचा या प्रस्तावाला छुपा पाठिंबा आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३६ मधील नगरसेविका रुक्साना नाझिम सिद्दीकी यांच्याकडून पालिकेच्या उद्यानास टिपू सुलतान उद्यान असे नाव देण्यात यावे अशी विनंती पत्राद्वारे केली होती. ही मागणी करताना टिपू सुलतान यांचे वर्णन भारताचे क्रांती सेनानी, योग्य शासक महान योद्धे, विद्वान, अशाप्रकारे करण्यात आले आहे तर भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी पहिला प्रयत्न केला होता असा दावाही करण्यात आला. या साऱ्या गोष्टी लक्षात घेता महापालिकेच्या उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी केली गेली.
गुरुवार १५ जुलै रोजी मुंबई महापालिकेच्या बाजार व उद्यान सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर चर्चेसाठी आला. तेव्हा भाजपाने या मागणीचा कडाडून विरोध केला. पण समितीच्या अध्यक्षपदी विराजमान असलेल्या शिवसेना पक्षाच्या प्रतीमा खोपडे यांनी या विषयाला बगल देत पळ काढला. “सदर उद्यानाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने हा विषय फेरविचारासाठी आयुक्तांकडे पाठवावा” असे त्यांनी आदेश दिले आहेत. या विषयात उपसूचना मांडण्यासाठी भाजपा नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग करत निषेध व्यक्त केला. अध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांना घेराव घालून जाब विचारला. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पण अध्यक्षांनी तिथूनही पळ काढला.
त्यानंतर सर्व भाजपा सदस्यांनी महापौरांना भेटून कशाप्रकारे लोकशाहीची मुस्कटदाबी होत आहे व नगरसेवकांना समिती सभेत बोलू दिले जात नाही याची माहिती दिली. व टिपू सुलतान उद्यान नावाला आमचा विरोध आहे व सदर नामकरण आम्ही होऊ देणार नाही; प्रसंगी रस्त्यावर उतरु असा इशाराही दिला.
हे ही वाचा:
मोदींकडून वाराणसीत १५०० कोटींची विकासकामे
सरकारचे बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष
इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी मोदी सरकारची महत्वाची पावले
‘हर घर जल’…२३ महिन्यांत ४.५ घरांना नळ जोडणी
भाजपाची भूमिका नेमकी काय?
भारतीय जनता पार्टीकडून सुरुवातीपासूनच या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्यात आला टिपू हा धर्मांध, क्रूरकर्मा, जुलमी अत्याचारी आणि हिंदू द्वेष्टा राजा होता. टिपूने म्हैसूर राज्याला मुस्लीम राष्ट्र घोषित केले होते. त्यासोबतच त्यांनी राज्यातील सर्व हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम करण्याची घोषणाही केली होती. सरकारने आपल्या कारकिर्दीत लाखो मुलींची कत्तल करुन मंदिरांचा विध्वंस केला होता. यासोबतच त्याने स्त्रियांवर अत्याचार केल्याच्याही घटना आहेत. असा राजा योग्य आणि महान शासक कसा असू शकतो? असा सवाल भाजपाकडून विचारण्यात आला आहे.
हिंदूंच्या मानबिंदूवर प्रहार व हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेला ठेच पोहोचवण्याची कृती करणे, धर्मांधता हे विद्ववत्तेचे लक्षण आहे काय? असाही सवाल भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला आहे. इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून, बाजीराव पेशव्यांपासून थेट झाशीच्या राणी पर्यंत सर्वांचा आपल्याला विसर पडला आहे का ? अशी विचारणा केली व या सर्व प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला. तर सदर उद्यानास मौलाना आझाद, महामहीम अब्दुल कलाम, हविलदार अब्दुल हमीद अशा भारतमातेच्या थोर सुपुत्रांची नावे देण्यास भारतीय जनता पक्षाचा संपुर्ण पाठिंबा असेल अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
या विषयात भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झाली असून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा नगरसेवक भालचंद्र शिरसाठ, मुंबई भाजपा सचिव प्रतीक कर्पे आदींनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. तर सोशल मीडियावरही या विषयावरून शिवसेना विरोधात वातावरण तापलेले दिसत आहे.