“शिवसेनेनं उप-यांच्या मदतीनंच हे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलंय.” असं म्हणत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर टीका करताना चित्रा वाघ असं म्हणाल्या.
“संजय राठोड, महेबूब शेख, निलेश लंके हे सरकारचे जावई अद्याप गजाआड का गेले नाहीत. महिला अत्याचाराचा मळा फुलवण्याचं काम सरकारचेच मंत्री करत आहेत. अन् मुख्यमंत्र्यांचं ‘नाचता येईना….असं सुरू आहे. ही तर विचारांची दिवाळखोरी. आज बाळासाहेबांसारख्या ताठ कण्याच्या नेत्याची कमतरता जाणवतेय.” असं म्हणत चित्र वाघ यांनी ठाकरे सरकारला महिला सुरक्षेच्या प्रश्नावर घेरलं आहे. गेल्या दोन महिन्यात बलात्काराच्या अनेक घटना महाराष्ट्रात पाहायला मिळाल्या आहेत. यातील अनेक घटनांमध्ये ठाकरे सरकारमधील मंत्री आणि नेतेच आरोपी असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामुळे ठाकरे सरकार महिला अत्याचारविरोधात किती गंभीर आहे यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं, असा आरोप चित्र वाघ यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
“झोळी घेतलेला ‘फकीर’ नसल्याचं राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री बोलताहेत हे खरंय. १०० कोटींच्या वसुलीवर शिक्कामोर्तब.” असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मी काही फकीर नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लागवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चित्रा वाघ यांनी ही ठाकरे सरकारच्या १०० कोटींच्या वसुलीची पावती असल्याची टीका करत, उद्रव ठाकरेंना त्यांच्याच जाळ्यात अडकवले आहे.
हे ही वाचा:
यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही हे कसले विचारांचे सोने लुटणार?
भाजपाच्या इशाऱ्यानंतर तामिळनाडू सरकारने मंदिरं उघडली
‘घोटाळेबाज सरकारला घालविण्यासाठी अंदमान निकोबार जेलमध्येही जाईन!
उद्धव ठाकरे म्हणजे लायसन्स नसलेले ड्रायव्हर, शिवसेनेचाच नेता असे का म्हणाला?
“उप-यांचं महत्त्व माननीय मुख्यमंत्र्यांना चांगलंच माहित आहे. शिवसेनेनं उप-यांच्या मदतीनंच हे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलंय.” असं चित्र वाघ म्हणाल्या. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून भाजपामध्ये अनेक उपरे आले असल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी शिवसेनेचं सरकार आणि उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची खुर्ची हीच मुळात काँग्रेस राष्ट्रवादीच्या टेकूवर असल्याची आठवण करून देत शिवसेनेवर टीका केली.