निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार ८ जानेवारी रोजी जाहीर केला. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. गोवा आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये काही जागा लढवणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली. इतर काही राज्यांमध्येही महाविकास आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. बिहारमध्येही शिवसेनेने निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. एवढेच नव्हे तर नोटापेक्षाही त्यांना कमी मते मिळाली होती.
गोव्यात आणि उत्तर प्रदेशात लढण्याची तयारी सुरु आहे. दोन्ही राज्यांमध्ये इतर मोठे पक्ष आहेत. हे मोठे पक्ष निवडणुकीसाठी चांगली तयारी करत आहेत. मोठ्या पक्षांचे बॅनर, होर्डिंग, प्रचार दिसत असतील. मात्र, शिवसेनेचे तसे काही नाही. शिवसेनेचा विचार आणि भूमिका लोकांपर्यंत जात असते, असेही संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
पाकिस्तानच्या सलीम मलिकची ती ऑफर ऐकून शेन वॉर्न हबकला!
पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमांची थोड्याचवेळात घोषणा
चंदीगड महापालिकेत पुन्हा भाजपाचाच महापौर
कोविडच्या सावटामध्ये ‘या’ नव्या नियमांसह पार पडणार पाच राज्याच्या निवडणूका
शिवसेना निवडणूक स्वबळावर लढणार का किंवा अन्य राज्यात महाविकास आघाडीसारखा प्रयोग करणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत बोलले की, गोव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे नक्कीच एकत्र लढण्याच्या विचारात आहेत. काँग्रेसने आमच्यासोबत राहावे यासाठी मी स्वत: गोव्यात जाऊन प्रयत्न केले आहेत. पण जागा वाटपाबाबत काही अडचणी आहेत. काँग्रेसला वाटते की, ते स्वबळावर सत्तेत येतील. त्यांना तसे वाटत असल्यास त्यांना शुभेच्छा, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. सर्व जागांवर लढणार नाही. पण गोवा आणि उत्तर प्रदेशात आम्ही काही जागांवर नक्की लढू, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.