मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव

मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव

मुंबई महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. म्हणजेच जवळपास ९ महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. परंतु आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचं कारण सांगत मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.

जुनी प्रभाग रचना बदलण्याचा शिवसेनाचा डाव फसल्याच्या दावाही आशिष शेलार यांनी केला. ते म्हणाले की, “जे प्रभाग आजन्म शिवसेना किंवा काँग्रेसला जिंकताच येणार नाही, अशा प्रभागांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु आहेत.” नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या बेपर्वाईने, ओबीसींचा राजकीय हक्क डावलला जाणार

चीनमध्ये आता अपत्ये तीन, लेकुरे उदंड होणार

काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली

स्पुतनिकची पहिली खेप आज भारतात पोहोचणार

आशिष शेलार म्हणाले की, “कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बहाणा समोर ठेवून आता जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदारनोंदणी करण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे आम्हाला जास्तीचा वेळ लागेल. म्हणजेच २०२१ च्या जनगणनेवर नवीन प्रभागरचना करता येऊ शकेल, म्हणून आताच्या महापालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचा आणि शिवसेनेचा निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा कुटिल प्रयत्न सुरु आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यास फेब्रुवारी २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीवर मुंबई महापालिका ठाम आहे. त्यात राज्य निवडणूक आयोगानेही मुंबई महापालिका यंत्रणेला तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. कोविडची परिस्थिती पाहून जूनअखेर निर्णय घेण्यात येईल, असं निवडणूक आयोगाने सांगितलं. कोरोना संकटामुळे मुंबई महापालिका निवडणूक होणार की पुढे ढकलणार अशी चर्चा सुरु झाली होती. त्यासंदर्भात पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत निवडणूक घेण्यावर ठाम असल्याचं मुंबई महापालिकाने सांगितलं.

Exit mobile version