महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेते आशिष शेलार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या संदर्भात माध्यमांशी बातचीत करताना प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार किंवा भाजपाचा कोणताच नेता महिलांविषयी चुकीचे वक्तव्य करूच शकत नाही असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
वरळी येथे नुकत्याच झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेवरून अशिष शेलार यांनी ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल केला होता. यावेळी आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा महिला आयोगाकडून करण्यात आला आहे. तर किशोरी पेडणेकर यांनी देखील या संदर्भात पोलीस तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा:
भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर
मूळ मुद्द्यावरून दुर्लक्ष करण्यासाठी दाखल केला गुन्हा
पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन
भाजपाचा कोणताही नेता आणि विशेषतः आशिष शेलार हे कोणत्याही महिलेविषयी अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरु शकत नाहीत. महापौरांविषयी तर नाहीच नाही. आशिष शेलार हे सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात आक्रमकपणे बोलत असल्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला का? हा देखील सवाल आहे असे फडणवीस म्हणाले. तर भारतीय जनता पार्टीला महिलांविषयी नितांत आदर आहे. त्यामुळे आशिष शेलार किंवा भाजपाचा इतर कोणताही नेता महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करू शकत नाहीत असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
तर यावेळी नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रश्न विचारला असता काँग्रेसने कोणताही उमेदवार दिला,उमेदवार बदलला किंवा आहे तोच ठेवला तरीही भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे हेच विजयी होतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.