२०२२ मध्ये होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना आपले उमेदवार उतरवणार आहे. शिवसेना सचिन आणि उत्तर प्रदेश कार्यालय प्रभारी विश्वजीत सिंह यांनी प्रसिद्धी पत्रक काढून या संबंधीची घोषणा केली आहे. तर शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील या विषयीचे सुतोवाच केले आहे. पण ही घोषणा केल्या पासूनच शिवसेना उमेदवार आपले डिपाॅझिट अर्थात अनामत रक्कम तरी वाचवू शकणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याला कारणेही तशीच आहेत.
वास्तविक महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेना हा पक्ष फक्त नावापुरता आहे. तरी देखील अनेकदा विविध विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा विरोधात उमेदवार उतरण्याच्या कसरती शिवसेना करताना दिसते. तसाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळणार आहे.
Shiv Sena to contest for all 403 seats in Uttar Pradesh Assembly elections in 2022. The party has not allied with any other political party as of now but has signaled the possibility of an alliance. pic.twitter.com/qqdZz6FQXH
— ANI (@ANI) September 11, 2021
हे ही वाचा:
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार चंद्रकांत पाटील
ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे
आणखीन एका बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला…नराधम अटकेत
रोनाल्डोचे दणक्यात पुनरागमन! युनायटेडने मारला गोल्सचा चौकार
२०१७ साली देखील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपले उमेदवार उतरवले होते. पण त्यावेळी त्यांना आपली अनामत रक्कम वाचवणेही शक्य झाले नव्हते. तर दुसरीकडे भाजपाने मात्र ३०० पेक्षा अधिक जागा जिंकत घवघवीत विजय मिळवला होता. यंदाही मतचाचणी मधून भाजपाला पूर्ण बहुमतासह एक हाती सत्ता मिळणार असल्याचे भाकित वर्तवण्यात येत आहे. तर यावेळीही शिवसेना कुठेच दिसत नाहीये. त्यामुळेच शिवसेना उमेदवार आपली अनामत रक्कम वाचवू शकणार का? असा सवाल विचारला जात आहे
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उतरत असली तरीही नेमक्या किती जागांवर शिवसेना उमेदवार उभे करणार याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. शिवसेना उत्तर प्रदेश कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार शिवसेना सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे म्हटले आहे. पण खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत शिवसेना ऐंशी ते नव्वद जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की शिवसेना नेमकी किती जागांवर निवडणूक लढणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण उत्तर प्रदेशात ४०० पेक्षा अधिक उमेदवार उभे करण्याइतकी ताकद शिवसेना पक्षात नाही. त्यामुळे सर्व मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता धूसरच आहे.