अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती

अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती

शिवसेनेने शरद पवारांबरोबर आघाडी केली आहे. परंतु शरद पवार यांची संयमी वृत्ती शिवसेनेने स्वीकारली नाही. अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती आहे. त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या पाठशाळेत शिकवणी लावावी असा सल्ला भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते, त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला.

स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. ज्यावेळी कोकणचे सुपुत्र नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले. तर सुरेश प्रभू यांना सुध्दा त्याकाळी अपमानास्पद वागणूक उद्धव ठाकरे यांनी दिली होती. बाकी रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झालं, अन्य नावे मी घेत नाही. आता राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कोकणाला काही मिळालं की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखतं? असा सवाल शेलार यांनी केला. उद्धव ठाकरेंविरोधात कोकणातील जनतेच्या मनात संताप आहे. येणाऱ्या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल, असा इशाराही शेलार यांनी दिला.

हे ही वाचा:

द एम्पायर या वेबसिरीजवर त्वरित बंदी घाला

…नाही तर ओबीसींची अपरिमित हानी होईल

या हल्ल्याचा बदला घेऊ

भारतात लवकरच स्वदेशी रिग्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळात कोकणाला मोठे स्थान दिले म्हणून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा निघाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरिबांसाठी ज्या अनेक योजना आहेत त्या आता घराघरात, गावागावात आपण घेऊन जाऊ या, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

Exit mobile version