काकांची पुंगी निघाली नागोबा डूलाया लागला

व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेकडून ठाकरे गटावर बोचरी टीका

काकांची पुंगी निघाली नागोबा डूलाया लागला

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका लागणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. व्यंगचित्रांच्या माध्यमातूनही अनेकदा टीकास्त्र डागले जाते. अशातच नागपंचमीच्या निमित्ताने शिवसेनेने शेअर केलेले व्यंगचित्र चांगलेच चर्चेत आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील राजकीय समीकरणे पालटली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. या दोन गटांकडून एकमेकांवर निशाणा साधण्याचे प्रकार सातत्याने सुरू असतात. शिवाय महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच आता शिवसेनेच्या ‘एक्स’ अकाऊन्टवरून एक व्यंगचित्र ट्वीट करण्यात आले आहे. हे व्यंगचित्र नागपंचमीच्या निमित्ताने शेअर करण्यात आले असून यामाध्यमातून उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचे मूर्तिमंत रूप’

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना १७ महिन्यानंतर जामीन

पॅरिस ऑलम्पिकमध्ये नीरज चोप्राला ‘रौप्य’ तर पाकिस्तानच्या अर्शदला ‘सुवर्ण’

पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या

शेअर करण्यात आलेल्या व्यंगचित्रात शरद पवार गटाचे नेते शरद पवार हे पुंगी वाजवताना दिसत आहेत. तर, त्यांच्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे डोलत असल्याचे चित्र दाखवण्यात आले आहे. शिवाय बाजूला दोन विझलेल्या मशालही दिसून येत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हावरूनही शिवसेनेने त्यांना चिमटा काढल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे शरद पवार यांच्या तालावर नाचत असल्याची बोचरी टीका या व्यंगचित्रातून करण्यात आली आहे. शिवाय या फोटोला मजेशीर कॅप्शन देऊन ठाकरे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. “काकांची पुंगी निघाली नागोबा डूलाया लागला” असे कॅप्शन फोटोला देण्यात आले आहे.

Exit mobile version