शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा

शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा

आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाचे अनेक नेते शिवसेनेवर बरसले. अतुल भातखळकर यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला चांगले चोपून काढले आहे.

आयोध्येतील भगवान श्रीरामांच्या जन्मस्थानावर होत असलेल्या भव्य राम मंदिराच्या बाबत शिवसेनेने केलेल्या घोटाळ्याचा आरोपावरून भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. बुधवार, १६ जून रोजी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या कार्यकर्त्यांनी दादर येथील सेना भवनवर ‘फटकार मोर्चा’ आयोजित केला होता. पोलिसांना या मोर्चाविषयी पूर्वसूचना देण्यात आली होती. लोकशाही मार्गाने झालेल्या या मोर्चावर पोलिसांच्या अडून शिवसेनेने हल्ला केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी कडून करण्यात आला आहे. या संपूर्ण विषयावरूनच अतुल भातखळकर यांनी शिवसेनेची खरडपट्टी केली आहे.

हे ही वाचा :

ट्वीटरने कायदेशीर संरक्षण गमावलं, केंद्र सरकारची कारवाई

शिवसेना भवनावर भाजपा युवा मोर्चाचा “फटकार मोर्चा”

शिवसेनेने दाखवली औरंगजेबी वृत्ती

राम मंदिर उभारणीत कोलदांडा घालणाऱ्या शिवसेनेला ‘फटकार’

बुधवार संध्याकाळपासूनच अतुल भातखळकर हे शिवसेनेवर तुटून पडले. ‘वसूलीसेनेने इटालियन काँग्रेसकडून राम मंदिर आंदोलन बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे.’ असा आरोप भातखळकरांनी केला आहे.

तर आपल्या एका ट्विटमध्ये भातखळकर शिवसेनेचा उल्लेख टिपूवादी सेना करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “राम मंदिर उभारणीला बदनाम कोण करतंय? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, आम आदमी पार्टी, डावे…हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक पक्ष आहेत. त्यांना राममंदिर नकोच होते. आता हे एकवटलेत मंदिर उभारणीत विघ्न आणायला. त्यात भर पडली आहे, ज्वलंत टिपूवादी शिवसेनेची. यांना लक्षात ठेवा” असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी शिवसेनेला ‘इटालियन लोटांगण घालू’ हे विशेषण लावत ‘जनता सुपारीबाज रामद्रोह्यांचे ‘राम नाम सत्य हैं’ केल्याशिवाय राहणार नाही’ असे म्हटले आहे. तर ‘महाराष्ट्रातील नव बाबरवाद्यांचा रामभक्तांपुढे कधीही टिकाव लागणार नाही.’ असे म्हणताना त्यांनी शिवसेनेला सामना बंद करून बाबरनामा सुरु करण्याचा सल्ला दिला आहे.

Exit mobile version