26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण...म्हणून तेजस ठाकरेंची व्हिव्हियन रिचर्ड्स सोबत तुलना! नार्वेकरांचा खुलासा

…म्हणून तेजस ठाकरेंची व्हिव्हियन रिचर्ड्स सोबत तुलना! नार्वेकरांचा खुलासा

Google News Follow

Related

शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातील जाहिरात चांगलीच चर्चेत आली आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ही जाहिरात दिली असून त्यात तेजस ठाकरे यांचा उल्लेख ‘ठाकरे कुटुंबातील व्हिव्हियन रिचर्ड्स’ असा केला आहे. यावरूनच सध्या चर्चेला उधाण आले असून तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशासाठी नार्वेकरांनी बॅटिंग सुरू केली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

ठाकरे कुटुंबात वर्तमानपत्र असलेल्या दैनिक सामना मधील मिलिंद नार्वेकर यांची जाहिरात त्यातील मजकुरामुळे चांगलीच गाजत आहे. त्यात मिलिंद नार्वेकर हे ठाकरे कुटुंबाचे आणि त्यातही विशेषतः उद्धव ठाकरे यांचे सुरुवातीपासूनचे निकटवर्तीय मानले जात होते. पण नंतर मुख्यमंत्र्यांनी अनिल परब याना जवळ केल्यामुळे नार्वेकरांचे महत्व कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात कायम असते. त्यामुळेच चर्चेत येण्यासाठी नार्वेकरांनी हे केले का? असाही तर्क लावण्यात येत आहे. पण या साऱ्या चर्चांमध्ये एक प्रश्न कायम राहतो की तेजस ठाकरे यांची तुलना विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतच का केली असावी?

स्वतः मिलिंद नार्वेकर यांनी या संबंधी उलगडा केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत मिलिंद नार्वेकर यांनी खुलासा करताना असे सांगितले की तेजस ठाकरे यांचा स्वभाव हा त्यांना वेस्टइंडीजचे धडाकेबाज निवृत्त फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासारखा भासतो. त्यामुळेच आपण त्यांचा उल्लेख ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स असा केला आहे असे नार्वेकर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

कोविडची होणार हार, लसीकरण ५० कोटी पार

आदर पुनावाला म्हणून भेटले आरोग्यमंत्र्यांना…

आपात्कालिन वापरासाठी जॉन्सन अँड जॉन्सनकडून देखील अर्ज

जम्मू- काश्मिरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

पण नार्वेकर यांची ही जाहिरात म्हणजे तेजस ठाकरे यांच्या राजकीय इनिंगसाठी पिच सेट करण्यासाठी तर केलेली नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तेजस ठाकरे हे आत्तापर्यंत अराजकीय व्यक्तिमत्त्व राहिले आहेत. निसर्ग आणि त्या संबंधित कामात त्यांचा रस दिसतो. पण मोठा भाऊ आदित्य यांच्याप्रमाणे आता तेजस ठाकरे यांचासुद्धा राजकीय लॉन्चिंगची ही सुरुवात ठाकरे कुटुंबाकडून करण्यात आली आहे का? असा सवाल केला जात आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे राजकीय कुटुंबातील अराजकीय व्यक्ती या कायमच अशा जाहिरातबाजीपासून अलिप्त असतात. पण तेजस यांचा फोटो आता राजकीय बॅनर्स आणि जाहिरातींमध्ये झळकू लागला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण आणखीन एका ठाकरेंचे राजकीय लॉन्चिंग होणार का हे पाहावे लागेल.

युवा सेनेची जबाबदारी तेजस ठाकरेंकडे?
आदित्य ठाकरे यांच्या राजकीय लॉन्चिंगसाठी शिवसेना पक्षातर्फे ‘युवा सेना’ ही युवक आघडी सुरु करण्यात आली होती. आदित्य ठाकरे हे युवा सेने प्रमुख म्हणून कार्यरत होते. पण सध्या ते महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत आहेत. अशात युवा सेनेची जबाबदारी तेजस ठाकरे यांच्याकडे दिली जाणार का? अशा देखील चर्चा सुरु आहेत. युवा सेनेच्या जाबदारीसाठी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय वरून सरदेसाई यांच्या नावाचीही चर्चा होती. पण तेजस ठाकरे यांना मैदानात आणून सरदेसाईंचा पत्ता कापला जाणार का? असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा