मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह अनेक आमदारांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले होते. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडावी अशी आमदार मागणी करत होते. मात्र असे झाली नाही, अखेर शिंदे आणि फडणवीसांनी राज्यात सरकार स्थापन केले. यादरम्यान, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहले होते. त्या पत्रात उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत हातमिळवणी करावी, अशी अप्रत्यक्षपणे मागणी केली होती. त्यांनतर शिवसेनेने भावना गवळींना धक्का देत त्यांना लोकसभा प्रतोदपदावरून हटवले आहे.
लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरून भावना गवळी यांना हटवण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या लेटरहेडवरून हे आदेश जरी करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
‘नवं सरकार सर्वसामान्यांचं आहे’
वीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!
ब्रिटनच्या आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा
“शिवसेना म्हणून मान्यता मिळेल, संख्याबळाच्या जोरावर धनुष्यबाण चिन्हंही मिळेल”
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. पत्रात एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले होते. यामुळे भावना गवळीही पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. तसेच कालच मुंबईतील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्यामध्ये भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती राहुल शेवाळे यांनी केली होती.