‘हजरत टिपू सुलतान की जय’, शिवसेनेची नवी घोषणा

‘हजरत टिपू सुलतान की जय’, शिवसेनेची नवी घोषणा

सत्तेत आल्यानंतर शिवसेनेने शिवसेनेने टिपू सुलतानाच्या जयंतीनिमित्त एक पोस्टर प्रकाशित केले आहे. यात लाखो हिंदूंची कत्तल करणाऱ्या जिहादी बादशहा टिपू सुलतानचा उल्लेख शिवसेनेने ‘शेर-ए-हिंद’ असा केला आहे. त्यामुळे एका बाजूला औरंगजेब धर्मनिरपेक्ष नव्हता असं सांगणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

टिपू हा म्हैसूरचा सुलतान होता. टिपू इंग्रज-मराठे-निजाम यांच्या संयुक्त फौजांशी लढताना मारला गेला होता. अत्यंत क्रुर आणि हिंदू द्वेष्ट्या टिपू सुलतानाने शेकडो मंदिरे पाडली असा इतिहास आहे. असा लौकिक असलेल्या टिपूच्या जयंतीनिमीत्त पोस्टर छापून शिवसेनेने आपले राजकारण कुठल्या दिशेने चालले आहे ते दाखवले आहे.

शिवसेनेचे हे पोस्टर मिरा- भायंदर येथील युवा शहर संघटक सलमान हाशमी यांनी छापले आहे. या पोस्टर वर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, गीता जैन, प्रताप सरनाईक यांचादेखील फोटो आहे.

शिवसेनेच्या या कृत्याने शिवसेनेला महापुरूषांचा विसर पडला आहे अशी घणाघाती टिका आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. शिवसेनेने आपला रंग तर बदलला आहेच आता महापुरूषही बदलले आहेत. याशिवाय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भगवे वस्त्र देखील हिरव्या रंगाचे केले आहे. अशी टिका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

यापूर्वी देखील शिवसेनेने नमाज पठण स्पर्धा, उर्दू भाषेतील कॅलेंडरवर जनाब बाळासाहेब उल्लेख यासारखे प्रकार करून, वाद ओढवून घेतला होता.

Exit mobile version