शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज२३ जानेवारी २०२३ रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे सगळ्यांबरोबर ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण या दोन्ही गटांमध्ये शिवसेना पक्ष कोणाचा ही लढाई सध्या सुरु आहे. शिवसेनेतील हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यामुळे त्यां निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज २३ जानेवारी २०२३ ला संपला आहे. त्यामुळे यापुढे शिवसेना पक्ष प्रमुख कोण असणार, उद्धव ठाकरेंची खुर्ची कायम राहणार की जाणार याकडे सगळ्यांचा नजरा लागल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
”उद्धव ठाकरे हेच आमचे पक्ष प्रमुख”
आज पक्षप्रमुखपदाचा कार्यकाल संपला असला तरी ठाकरे समर्थकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आमचे पक्ष प्रमुख आहेत आणि राहतील, असं स्पष्ट मत उद्धव गटाचे नेते अनिल परब यांनी केलं आहे. शिवाय पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारी असल्यामुळे आयोगाच्या निर्णयानंतरच पुढील रणनीती ठरविण्यात येईल,असं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब
जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय
पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण
महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक
३० जानेवारीला लेखी उत्तर
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना कोणाची असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. हा वाद आयोगाकडे प्रलंबित आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांनी शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर आपला युक्तिवाद पूर्ण केला आहे. आता जर काही निवेदन असेल तर त्यांना ३० जानेवारीपर्यंत सादर करण्यासाठी आयोगाने सांगितलं आहे. त्यामुळे यावर ३० जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी आयोग आपला निर्णय सांगणार आहे.
आता शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण,हे आज ठरणार असून उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार? हा महत्वाचा प्रश्न आहे.