शिवसेनेचे कर्तृत्व…फक्त बॅनरबाजी आणि पीआरबाजी

शिवसेनेचे कर्तृत्व…फक्त बॅनरबाजी आणि पीआरबाजी

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर टीकास्त्र डागले आहे. मुंबई महापालिकेने १५ आणि १६ मे रोजी लसीकरण बंद केल्याच्या निर्णयावरून भातखळकरांनी महापालिकेला खडे बोल सुनावले आहेत. शिवसेनेचे कर्तृत्व…फक्त बॅनरबाजी आणि पीआरबाजी असे म्हणत अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे .

देशात सुरु असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. त्यात महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनता रोज भरडली जात आहे. देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन आता काही महिने झाले तरीही महाराष्ट्र सरकारचा लसीकरणाच्या बाबतीत सावळा गोंधळ सुरूच आहेत. शुक्रवार, १४ मे रोजी मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आले की शनिवार १५ मे आणि रविवार १६ मे रोजी मुंबई महापालिका क्षेत्रातील लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत ही माहिती देण्यात आली.

हे ही वाचा:

ग्लोबल टेंडर बाबतही ठाकरे सरकार काखा वर करण्याच्या तयारीत

झीशान सिद्दिकींकडून शिवसेनेला इदी

सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?

ग्लोबल टेंडरच्या बाबतीत ठाकरे सरकार फक्त दिवस ढकलतंय

यावरूनच अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला आणि महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ‘फक्त बॅनरबाजी आणि पीआरबाजी’, मुंबई महापालिकेने १५ आणि १६ मे रोजी लसीकरण बंद राहील असे जाहीर केले आहे. लसीकरण केंद्र एक आणि बॅनर शंभर अशी ‘पीआर मात्रा’ ठरवलेल्या सत्ताधारी शिवसेनेचे हे कर्तृत्व आहे असे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version