26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणमुख्यमंत्री भेटत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची तक्रार

मुख्यमंत्री भेटत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची तक्रार

Google News Follow

Related

महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये सर्व काही सुरळीत चाललं असल्याचे चित्र ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून दाखवण्याचा प्रयत्न सुरू असतो. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. शिवसेनेचे खासदार सध्या नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना खासदारांची सोमवार, ४ एप्रिल रोजी नवी दिल्लीत बैठकी झाली. या बैठकीत शिवसेना खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेना खासदारांची काल नवी दिल्लीत बैठकी झाली. संध्याकाळी सुरु झालेली ही बैठकी रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु होती. मराठावाडा आणि विदर्भात राबवण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानातून नेमकी काय परिस्थिती आहे हे खासदारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आला. मात्र, या बैठकीत खासदारांनी आपल्या मनातली खदखद शिवसेना खासदार संजय राऊत यांना बोलून दाखवली.

शिवसेना मंत्री कार्यकर्त्यांची कामं करत नाहीत, त्यामुळे शिवसेना कमकुवत होत असल्याची तक्रार खासदारांनी केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेटत नसल्यानेही खासदार नाराज आहेत. उद्धव ठाकरे यांची लवकरच खासदारांची भेट घडवून देणार असल्याचे संजय राऊत यांनी खासदारांना आश्वासन दिले आहे.

पक्षाला वेळीच बळकटी दिली नाही तर निवडणुका लढवणं कठीण होणार असल्याचा इशाराही या बैठकीत शिवसेना खासदारांनी संजय राऊत यांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्रास दिला जात असून शिवसेना आमदारांना निधी दिला जात नसल्याचा मुद्दाही याबैठकीत खासदारांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

गोरखनाथ मंदिर हल्लेखोराचे इस्लामिक स्टेट, सिरियाशी कनेक्शन

करौली हिंसाचारप्रकरणी ४६ जणांना अटक; कर्फ्यू ७ एप्रिलपर्यंत वाढवला

तब्बल चार तास मुलांना घेऊन शाळेची बस गायब!

केमिकल इंजीनियर अब्बासीने केला गोरखपूर मठाच्या सुरक्षा जवानांवर हल्ला

खासदारांनी दर्शवलेल्या नाराजीमुळे महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत. शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी देखील काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारला घराचा आहेर दिला होता. राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य देखील कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करू. आमची नाराजी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आहे, असे तानाजी सावंत म्हणाले होते. तसेच केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा, असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा