30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणतुंबलेल्या मुंबईवरून 'शेवाळे' केंद्रावर घसरले

तुंबलेल्या मुंबईवरून ‘शेवाळे’ केंद्रावर घसरले

Google News Follow

Related

‘मुंबई तुंबली याला मोदी सरकार जबाबदार आहे’ असा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. आपल्या आरोपांचे समर्थन करताना शेवाळे यांनी एक अजब तर्क दिला आहे. केंद्र सरकारने अंडरग्राउंड टनेलची परवानगी वेळेत न दिल्यामुळे मुंबईत पाणी साचले असा आरोप शेवाळे यांनी केला आहे.

मुंबईत सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. रोज बरसणाऱ्या धुवाधार पावसामुळे मुंबईकरांचे मात्र हाल होताना दिसत आहेत. धो धो कोसळणार्‍या पावसामुळे अवघ्या काही तासातच मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता, दादर या परिसरात पाणी तुंबलेले पाहायला मिळत आहे. या तुंबणार्‍या मुंबईवरून दरवर्षीच शिवसेना शासित मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले जात असतात. पण आता याचीही जबाबदारी केंद्रातल्या मोदी सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होताना दिसत आहे.

हे ही वाचा:

काश्मीरच्या सोपोरमध्ये सीआरपीएफवर दहशतवादी हल्ला

संजय राऊत यांनी हे मान्य केलं की त्यांचा वाघ हा पिंजऱ्यातला आहे

ठाकरे सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर

बीएसएफकडून चीनी गुप्तहेराला अटक

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी एक नवा जावईशोध लावत मुंबईतल्या साचलेल्या पाण्याची जबाबदारीही मोदी सरकारवर ढकलली आहे. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना, शेवाळे यांनी मुंबई तुंबली याला मोदी सरकारच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या माथ्यावर खापर फोडण्याचा शेवाळे यांनी प्रयत्न केला आहे. हिंदमाता येथील अंडरग्राउंड टनेलसाठी परवानगी तीन महिन्यापासून मागितली जात होती पण केंद्र सरकारकडून ती परवानगी देण्यात उशीर झाला. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होऊ शकली नाहीत. म्हणूनच हिंदमाता परिसरात पाणी साचत असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला आहे.

दरम्यान पहिल्या पावसाने मुंबई तुंबली तेव्हाच भारतीय जनता पार्टीकडून अशी प्रतिक्रिया देण्यात आली होती की, ‘किमान याची तरी जबाबदारी केंद्र सरकार वर ढकलली जाणार नाही अशी अपेक्षा आहे.’ भाजपा मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली होती. पण आता शिवसेनेकडून तुंबलेल्या मुंबईसाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यात आल्यामुळे या विषयावरून नवे राजकारण तापले आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेवाळे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आता फक्त मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरणे बाकी आहे.” असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा