‘अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर उद्धव साहेबांनी विचार करायला हवा’

‘अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर उद्धव साहेबांनी विचार करायला हवा’

शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा आरोप

महाविकास आघाडी सरकारमधले अंतर्गत वाद आता लपून राहिलेले नाहीत. अशातच शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे सरकारला घराचा आहेर दिला आहे. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. सत्तेत सोबत आहात ना? मग आमच्यावर कशाला वार करता? असे प्रश्न तानाजी सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

अर्थसंकल्पात शिवसेनेला मिळालेला निधी कमी असल्यावरून काही शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तानाजी सावंत यांनी देखील याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. तानाजी सावंत म्हणाले की, “आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. शिवसेना विस्थापितांचा गट आहे. कोणीही आजमावून बघू नये. शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते आणि अर्थसंकल्पामध्ये देखील हेच दिसून आले आहे,” असेही तानाजी सावंत म्हणाले.

हे ही वाचा:

रमापती शास्त्री यांची प्रो-टेम स्पीकर म्हणून नियुक्ती!

“हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत, देवाचो सोपूत घेता की…”

१ एप्रिलला पंतप्रधान मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार

पोस्ट टाकली म्हणून शिवसैनिकांनी मारले

“अर्थसंकल्पात ६५-६० टक्के बजेट राष्ट्रवादीला, ३०-३५ टक्के बजेट काँग्रेसला आणि १६ टक्के शिवसेनेला त्यातही पगार काढावे लागतात. विकास कामाला केवळ १० टक्के बजेट शिवसेनेला मिळालं आहे,” असे तानाजी सावंत म्हणाले. “राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य देखील कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं. आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करू. आमची नाराजी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आहे,” असे तानाजी सावंत म्हणाले. मागील अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Exit mobile version