23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणशिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन

Google News Follow

Related

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रमेश लटके हे आपल्या कुटुंबासोबत दुबईला फिरायला गेले असताना बुधवार, ११ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

आमदार रमेश लटके यांनी तीन दिवसांपूर्वी अंधेरीमध्ये सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात मंत्री अनिल परब आणि मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर ते पहिल्यांदाच दुबईला आपल्या कुटुंबासोबत फिरायला गेले होते. तेव्हाच दुबईमध्ये त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकात मशिदीवर फडकला भगवा

राणा दाम्पत्याची पुन्हा एकदा हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा

राजद्रोहाच्या सर्व खटल्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!

आशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेच्या (एएईए) अध्यक्षपदी भारत!

रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या कारकिर्दीत त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार अशी विविध पदं भूषवली होती. रमेश लटके यांनी १९९७ ते २०१२ असे सलग तीन वेळा नगरसवेक पद भूषवले. त्यानंतर २०१४ मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा