मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना किती वर्ष ब्लॅकमेल करणार आहात, असा सवालच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
आमदार रामदास कदम यांनी आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना जे काही मिळाले ते शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मिळाले. पूढे आदित्य ठाकरेंना जे काही मिळाले ते उद्धव ठाकरे यांचा मुलगा म्हणून मिळाले असे रामदास कदम म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे असे सांगत किती दिवस महाराष्ट्राला ब्लॅकमेल करणार आहात? सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का, असे सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केले आहेत. पक्ष कुणी वाढवला असा सवाल करत रामदास कदम म्हणाले, पक्ष आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी वाढवला आहे. आता सगळ्यांच्या त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. गेल्या अडीच वर्षात काय झालं होतं. उद्धव ठाकरे यांनी भावनात्मक डायलॉग बाजी थांबवावी, असंही रामदास कदम म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला
सचिननंतर मुंबईत विराटही सुरू करतोय रेस्टॉरन्ट
बॅनरला विरोध केला म्हणून मनसे कार्यकर्त्याची महिलेला धक्काबु्क्की
मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात
पुढे रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रालयात आले, कोकणात वादळ आले, अस्मानी संकट आले तेव्हा कोकणवासीयांची अश्रू पुसायला त्यांना वेळ नव्हता, शरद पवारांसारख्या नेता कोकणात आला मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अश्रू पुसण्यासाठी कोकणात आले नाहीत. आता महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी आता खुले केले आहेत. याआधीच जर आमदार खासदारांना वेळ दिला असता भेटला असतात तर आज ही वेळ आली नसती. अजित पवार जेव्हा शिवसेनेच्या आमदारांना संपवत होते तेव्हा आमदारांचे ऐकले असते तर ही वेळ आली नसती. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावरही टीका केली आहे.