महाविकास आघाडी सरकार पाठीशी उभे राहिले नाही: सरनाईकांची खंत

महाविकास आघाडी सरकार पाठीशी उभे राहिले नाही: सरनाईकांची खंत

गेले काही महिने नॉट रिचेबल असणारे ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे आज, ५ जुलै रोजी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला अवतरले. पक्ष प्रतोदांनी व्हीप काढून सर्व आमदारांना हजर राहण्याचे आदेश दिल्यामुळे सरनाईक यांना नाईलाजास्तव अधिवेशनाला हजर राहावे लागले. पण यावेळी माध्यमांशी बोलताना सरनाईक यांनी महाविकास आघाडी बद्दल खंत व्यक्त केली. मी अडचणीत असताना महाविकास आघाडी माझ्या पाठीशी उभी राहिली नाही असं म्हणत सरनाईक यांनी आघाडी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहित महाविकास आघाडी सरकार बद्दलची खदखद बोलून दाखवली होती. या पत्रात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सहयोगी पक्षांवर गंभीर आरोप केले होते. हे दोन पक्ष शिवसेना कार्यकर्ते आणि नेत्यांना फोडत आहेत असा दावा सरनाईक यांनी केला होता. तर पुन्हा भाजपासोबत जुळवून घ्यावे असा सूरही या पत्रात आळवला होता.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार अजून किती स्वप्निलच्या आत्महत्येची वाट पाहणार?

ठाकरे सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय

या ठरावाने ओबीसींना आरक्षण मिळणार नाही

ठाकरे सरकारला गरीब मुलांची नाही, ‘आपल्या’ मुलांची काळजी

या पत्राच्या अनुषंगाने सरनाईक यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. जेव्हा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर आरोप केले जात होते तेव्हा महाविकास आघाडी सरकारने माझ्या पाठीशी उभे राहायला हवे होते असे सरनाईक म्हणाले. पण नंतर मात्र त्यांनी त्या पत्राच्या अनुषंगाने इतर काही भाष्य करणे टाळले. त्या पत्राचा विषय आता माझ्यासाठी संपलेला आहे असे म्हणत सरनाईक यांनी काढता पाय घेतला.

मी विजय मल्ल्या नाही
अनेक महिन अज्ञातवासात असणाऱ्या सरनाईक यांनी विरोधकांनी आपल्या ईडीचा ससेमिरा लावला असे म्हटले आहे. तर कौटुंबिक कारणामुळे आपण माध्यमांपासून दूर असल्याचा खुलासा त्यांनी केला. तर यावेळी बोलताना गायब व्हायला मी कधी निरव मोदी, विजय मल्ल्या किंवा मेहुल चोक्सी नाही असे सरनाईक म्हणाले.

Exit mobile version