22 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरक्राईमनामाशिवसेना आमदार लता सोनवणे यांना जात पडताळणी समितीचा दणका

शिवसेना आमदार लता सोनवणे यांना जात पडताळणी समितीचा दणका

Google News Follow

Related

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लता सोनवणे यांना नंदुरबारच्या जात पडताळणी समितीने दणका दिला आहे. सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. या प्रकरणासंदर्भात चोपड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी तक्रार केली होती.

लता सोनवणे यांचा टोकरे कोळी अनुसूचित जमातीचा दाखला निवडणुकीच्या प्रयोजनार्थ १० एप्रिल २०१९ रोजी जात पडताळणी समितीला सादर केला होता. त्यानंतर त्यांचा अनुसूचित जमातीचा दावा ४ नोव्हेंबर २०२० रोजीच्या न्यायालयाच्या विस्तृत आदेशान्वये जात पडताळणी समितीने अवैध घोषित केला होता. समितीच्या अवैध आदेशाविरुद्ध आमदार सोनवणे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

या निर्णयाविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे लता सोनवणे यांनी सांगितले. औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात या प्रकरणी ३ डिसेंबर २०२० रोजी निर्णय देताना समितीचा आदेश रद्दबातल करण्यात आला. अर्जदाराला सक्षम प्राधिकारी म्हणजेच, अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून नव्याने जात प्रमाणपत्र प्राप्त करून सात दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश त्यावेळी देण्यात आले होते. तसेच सदर प्रकरण चार महिन्यात निकाली काढण्याबाबत समितीस निर्देश दिले होते. म्हणून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आमदार लता सोनवणे यांनी नव्याने सक्षम प्राधिकारी यांच्याकडून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करून समितीला ९ डिसेंबर २०२० रोजी प्रस्ताव सादर केला होता.

हे ही वाचा:

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन

संजय राऊत यांचा ‘साडे तीन’ चा फ्लॉप शो…

मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार?

लता सोनवणे यांचा प्रस्ताव दाखल करताना पूर्वीच्या पुराव्यांव्यतिरिक्त नवीन अधिकचे पुरावे प्रस्ताव सोबत सादर करण्यात आले. तसेच सदर पुरावे प्रथमच समितीसमोर आल्याने पुराव्यांची सत्यता पडताळणी करणे आवश्यक असल्याने आमदार सोनवणे यांचे प्रकरण पोलीस दक्षता पथकाकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा