मंत्रालयात मंत्री उपस्थित नसतात… मुख्यमंत्र्यांकडे रोख?

मंत्रालयात मंत्री उपस्थित नसतात… मुख्यमंत्र्यांकडे रोख?

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु असून यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले असून अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरुनही विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान आता खुद्द शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन नाराजी व्यक्त केली आहे.

आशिष जयस्वाल यांनी अधिवेशनात म्हटले की, “मागील दोन वर्षांपासून सत्तास्थापन झाल्यानंतर विविध लोकप्रतिनिधी दर बुधवारी मुंबईला मंत्रालयात येतात. दिवसभर काम करुन संध्याकाळी परत जातात. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निवदेनासंदर्भात, पत्रावर काय कारवाई झाली याची माहिती मिळण्याची काही ऑनलाइन सोय नाही. अडचणींमुळे अधिवेशनाचे दिवसही कमी झाले आहेत. जनतेचे सर्व प्रश्न मांडता येत नाही,” असे म्हणाले. तसेच लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचा संपर्कच होत नसेल तर काय करावे? असा प्रश्नही विचारला. तेव्हाच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुकही केले.

हे ही वाचा:

… म्हणून कोरोना मृतांच्या यादीत चक्क जिवंत माणसे!

‘अटलजींनी देशाला प्रभावशाली आणि विकसित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले’

सुरू झालेल्या शाळेत लसीकरण केंद्र

शेणापासून बनवलेला रंग चालला परदेशात

जयस्वाल यांच्या वक्तव्या नंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ट्विट करून अतुल भातखळकर यांनी ‘मुख्यमंत्री महोदय, इथे लक्ष द्या…’ असे म्हटले आहे.

त्यामुळे आता शिवसेनेच्या आमदारानेच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्री हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे सर्व कामांसाठी गैरहजर राहत आहेत. अधिवेशनही त्यांच्या अनुपस्थितीत होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या मंत्र्याकडे तात्पुरता पदभार द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

Exit mobile version