महाराष्ट्राच्या सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे समर्थक नागपूर येथील आमदार आशिष जयस्वाल यांनी महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर तोफ डागली आहे. ‘काँग्रेस नेते मेले होते, उद्धव ठाकरे यांनी सत्तेत घेतल्यावर पुन्हा जिवंत झाले’ असे विधान जयस्वाल यांनी केले आहे. आमदार आशिष जयस्वाल यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
आशिष जैस्वाल यांनी नागपूर येथे बोलताना महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते मेले होते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सत्तेत घेतल्यावर ते पुन्हा जिवंत झाले. या दोन्ही पक्षांमध्ये गळती लागली होती. तुम्हाला कोणी विचारात नव्हते. तुमच्या पक्षातले नेते सुटकेस बांधून तयार होते. दुसऱ्या पक्षात दाखल होणार होते. पण उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हाला सत्तेत घेतले आणि पुन्हा जिवंत केले आहे. तुम्ही शिवसेनेच्या मतदारसंघात इतरांना मतदान कार्याला सांगता. पण मी एकेकाला पुरून उरेन असे म्हणत आशिष जयस्वाल यांनी प्रहार केला आहे.
हे ही वाचा:
…आपल्या भावंडाच्या दुःखाने बेजार मांजर बसून राहिले थडग्याजवळ!
…म्हणून डॉक्टरांनी एका दिवसात केले ६७ गर्भपात!
सैन्याने हाणून पाडला काश्मीरमध्ये ७ दिवसांत घुसखोरीचा सातवा प्रयत्न
लागा तयारीला; तीन लोकसभा आणि ३० विधानसभा पोटनिवडणुका होणार
आशिष जयस्वाल यांच्या या विधानाने महाविकास आघडीतील संघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची चिन्ह आहेत. यापूर्वीही अनेकदा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांशी उणीदुणी काढली आहेत. ज्यामुळे महाविकास आघाडीत सगळे आलबेल आहे हे दाखवण्याचा त्यांचा दावा खोटा पडला आहे.