पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी विरोधकांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली असताना, संजय राठोड हे गेले दोन दिवस त्यांची गाडी (MH 01DP 7585) मंत्रालयाच्या प्रांगणात ठेऊन अज्ञातवासात गेले आहेत. संजय राठोड हे नॉट रिचेबल आहेत. मात्र त्यांची गाडी दोन दिवसांपासून मंत्रालयाच्या कार पार्किंगमध्येच आहे.
हे ही वाचा:
राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. पुणे पोलिसांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांना राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी बोलावले. दिपक लगड यांच्याकडून हेमंत नगराळे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याची माहिती दिपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना दिली.
महाविकास आघाडी सरकारव जोरदार टीका करत या प्रकरणाची चौकशी सरण्याची मागणी अतुल भातखळकर यांनी केली. “या प्रकरणात समोर आलेल्या ऑडिओ क्लीप ताब्यात घेतल्या पाहिजेत. त्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठवून तो आवाज कोणाचा आहे? हे तपासले पाहिजे. लॅपटॉही स्कॅन केला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या सर्व तपासाच्या गोष्टी असून, गुन्हेगारांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.