शिवसेनेचे नेते आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या मालकीच्या साखर कारखान्यावर टाच आली आहे. साखर आयुक्तांनी कारखाना जप्तीचा आदेश काढला आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात संदिपान भुमरे यांचा शरद सहकारी साखर कारखाना आहे. शेतकऱ्यांची ऊसाची देणी थकवल्यामुळे जप्तीचा आदेश आयुक्तांनी काढल्याचे समजले आहे. त्यासंदर्भातील आदेश औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
रेखा जरे प्रकरणातील सुत्रधार ताब्यात
भुमरे यांनी शेतकऱ्यांनी तब्बल १७ कोटी ४९ लाख रुपयांची देणी थकवली आहेत. त्यामुळे आयुक्तांनी कारखाना जप्त करून शेतकऱ्यांची देणी देण्याचे आदेश दिला आहे. मात्र मंत्री संदिपान भुमरे यांनी हे आरोप फेटाळून लावत, शेतकऱ्यांची सर्व देणी दिल्याचे सांगितले आहे.
संदिपान भुमरे हे शिवसेनेचे औरंगाबादमधील दिग्गज नेते आहेत. पैठणमधुन ते १९९५ पासून सलग पाचवेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.