ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा स्वबळाचा नारा

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा स्वबळाचा नारा

ठाणे जिल्हा हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेला आहे. सेनेच्या या बालेकिल्ल्यात आता स्वबळाचा नारा ऐकायला येत आहे. ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्याच वेळी आघाडी संदर्भातील अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील असे त्यांनी सांगितले आहे.

कळवा येथील खारेगाव पुलाच्या श्रेयावरून हा वाद नव्याने उफाळून आला आहे. शनिवार, १५ जानेवारी रोजी ठाण्यातील खारेगाव येथे पुलाचे लोकार्पण पार पडले. यावेळी मंचावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी भाषणातून दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात टोलेबाजी केली. या कार्यक्रमानंतरही शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आणि कळ्यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद परांजपे यांनी पलटवार केला.

हे ही वाचा:

छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी कोणाची परवानगी हवीच कशाला?

संगीतद्वेष्ट्या तालिबान्यांनी भरचौकात जाळली वाद्ये!

किरण माने करायचा महिला सहकलाकारांसोबत गैर वर्तणूक

भारतीय लष्कराच्या लढाऊ गणवेशाची पहिली झलक

या सर्व नाट्यानंतरच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याची दिली आहे. “आघाडीच्या संदर्भात पक्षप्रमुख, पालकमंत्री निर्णय घेतील. परंतु एकंदरीत जे काही चित्र निर्माण केलेले आहे. अशा पद्धतीने जर आरोप-प्रत्यारोप होणार असतील तर हे चित्र बघता महापौर म्हणून किंवा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मला वाटत नाही की आघाडी शक्य आहे.” असे म्हस्के म्हणाले. त्याचवेळी, “पक्षप्रमुख किंवा पालकमंत्री जो काय निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल. पण मी स्वतः आघाडी करावी या मताचा नाही आणि शिवसैनिक आणि इतर नगरसेवक यांचेसुद्धा हेच मत आहे” असे नरेश म्हस्केंनी सांगितले.

Exit mobile version