आपल्या सडेतोड आणि आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे होत असलेल्या नव्या उड्डाणपुलाला सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यावरूनच भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘सोनिया मातोश्रींच्या चरणी गेल्यापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलय’ अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे एक नवीन उड्डाणपूल होत आहे. या उड्डाणपुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शेवाळे यांनी ही मागणी केली आहे. त्यासाठी शेवाळे यांच्याकडे मुस्लिम संस्थांकडून निवेदने आल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर छेडानगर ते मानखुर्द या परिसरात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही मुस्लिम असल्यामुळे या उड्डाणपुलास सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देऊन मुस्लिम समाजाच्या भावनांचा सन्मान करावा अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.
हे ही वाचा:
रशिया विरुद्ध बेल्जियमचा सोपा विजय
डेन्मार्कला नमवत फिनलँडचा ऐतिहासिक विजय
संजय राऊत यांनी हे मान्य केलं की त्यांचा वाघ हा पिंजऱ्यातला आहे
तुंबलेल्या मुंबईवरून ‘शेवाळे’ केंद्रावर घसरले
राहुल शेवाळे यांच्या या मागणीवरूनच भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून भातखळकरांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’ पासून सुरू झालेला प्रवास जेव्हा हजरत टिपू सुलतान की जय पर्यंत येतो तेव्हा अशा पत्रांचे आश्चर्य वाटत नाही. काँग्रेस,असदुद्दीन ओवेसीच्या मतपेढीला शिवसेनेने तीव्र स्पर्धा निर्माण केली आहे. सोनिया मातोश्रींच्या चरणी गेल्यापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलय’ असे जहाल ट्विट भातखळकर यांनी केले आहे.
'जय भवानी, जय शिवाजी'पासून सुरू झालेला प्रवास जेव्हा हजरत टिपू सुलतान की जय… पर्यंत येतो तेव्हा अशा पत्रांचे आश्चर्य वाटत नाही.
काँग्रेस,असदुद्दीन ओवेसीच्या मतपेढीला शिवसेनेने तीव्र स्पर्धा निर्माण केली आहे. सोनिया मातोश्रींच्या चरणी गेल्यापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलय. pic.twitter.com/qROvTrxguR— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 13, 2021