पालिकेच्या टक्केवारी कारभाराबद्दल शिवसेनेतच खदखद

पालिकेच्या टक्केवारी कारभाराबद्दल शिवसेनेतच खदखद

गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या कारभाराविरोधात जनतेत प्रचंड संताप आणि चीड आहेच, पण आता खुद्द शिवसेनेतच पालिकेच्या भ्रष्ट कारभाराबद्दल नाराजी आहे.

चांदिवली येथील आमदार दिलीप लांडे हे असेच पालिकेच्या दिरंगाईने संतप्त झाले आणि आपल्या मतदारसंघात रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यात पालिका कंत्राटदारालाच त्यांनी बसवले. त्या कंत्राटदाराला त्या तुंबलेल्या पाण्यात बसवून त्याच्यावर तिथे तुंबलेला कचरा टाकून त्याच्या दिरंगाईचा निषेध करण्यात आला. सदर कंत्राटदार कामात प्रचंड हयगय करत असल्यामुळे आपण त्याला ही शिक्षा दिल्याचे लांडे म्हणाले.

हे ही वाचा:

डेन्मार्कला नमवत फिनलँडचा ऐतिहासिक विजय

‘घरी रहा, योगाभ्यास करा’…७ व्या योग दिनाची संकल्पना

मजल्यावर मजले सहा…मालवणीतला अनधिकृत प्रताप पाहा

ठाकरे सरकारने लस खरेदीची वाचलेली रक्कम शेतकऱ्यांना द्यावी

एकूणच पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेतच पालिकेतील या टक्केवारीच्या कारभाराबद्दल रोष असल्याचे या घटनेतून दिसून येते आहे. गेली जवळपास २५ वर्षे पालिकेची सत्ता महापालिकेत आहे. पण त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबईची तुंबई होण्याच्या घटना दरवर्षी घडताना दिसत आहेत. गेले दोन दिवस मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसात पालिकेची पुरती पोलखोल झाली. त्यातच पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे अनधिकृत बांधकामांचेही पेव फुटले. नालेसफाईतील भ्रष्टाचार दरवर्षी समोर येत असतोच.

यंदाही पालिकेकडून नालेसफाई पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला असला तरी गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे हे सगळे दावे फोल ठरले. अवघ्या दोन दिवसांतील पावसानेच मुंबईची पालिकेच्या या कारभारामुळे पुरती दाणादाण उडाली. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न तर महापौरांनी न्यायालयावरच ढकलला. या सगळ्या प्रकारांमुळे जनतेत पालिका प्रशासनाच्या कारभाराबद्दल प्रचंड नाराजी आहे. आता तर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेतेच या कारभाराबद्दल अशा पद्धतीने जाहिररित्या राग व्यक्त करू लागले आहेत.

Exit mobile version