‘या’ शिवसेना नेत्यामागेही लागला ईडीचा ससेमिरा

‘या’ शिवसेना नेत्यामागेही लागला ईडीचा ससेमिरा

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी शिवसेनेच्या एका नेत्याची सक्तवसुली संचालनालयातर्फे चौकशी झाल्याची बातमी समोर येत आहे. या बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी एचडीआयएल कंपनीचे मालक राकेश वाधवा यांच्याशी या शिवसेना नेत्यांचे संबंध असल्याच्या माहिती ईडीला मिळाली आहे. त्यावरूनच या दोघांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारा संबंधीची ही चौकशी सुरू झाल्याचे समजते.

हे शिवसेना नेते म्हणजे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवी आहेतदळवी यांना २५ जून पासून चार ते पाच वेळा ईडी कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिली आहे. टीव्ही ९ च्या दाव्यानुसार खात्रीलायक सूत्रांकडून त्यांना ही माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा:

…पुरावा द्या, नाहीतर ५० कोटींचा दावा ठोकतो!

विकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा

भारतीय नौदलाच्या ताफ्यात अमेरिकेची एमएच-६०आर हेलिकॉप्टर्स दाखल

घरे पडल्याची बातमी कळताच मंगल प्रभात लोढा धावले

कोण आहेत शिवसेना नेते प्रमोद दळवी?
प्रमोद दळवी हे वसई-विरार सह मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत. शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक असे पद त्यांच्याकडे असलेले तरीही आपल्या व्यवसायामुळे दळवी हे जास्त चर्चेत असतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराची धुरा प्रमोद दळवी यांनी सांभाळली होती.

प्रदीप शर्मा आणि प्रमोद दळवी

२०१६ मध्येही प्रमोद दळवी वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. नोटबंदी काळात तत्कालीन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक धनंजय गावडे यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि लोकल क्राईम ब्रांचने पकडले होते. त्यांच्याकडे १ कोटी १५ लाख रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या होत्या. त्यावेळी या नव्या नोटा प्रमोद दळवी यांच्या घरातून गावडे यांनी घेतल्याचे तपासातून समोर आले होते. या प्रकरणातही गावडे सह प्रमोद दळवी यांच्या घरांची दोन दिवस तपासणी झाली होती.

Exit mobile version