शिवसेना नेत्याने लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले

शिवसेना नेत्याने लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले

नवी मुंबई शहरातील मुख्य वर्दळीच्या भागातच गर्दी जमवून शिवसेना नेत्याने वाढदिवसाचा जल्लोष केल्याचं समोर आलं आहे. माजी नगरसेवक सुरेश कुळकर्णी यांनी गजबजलेला रस्ता अडवून फटाक्यांची आतषबाजी केली. लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत तुर्भे परिसरात केलेल्या या जल्लोषामुळे टीकेची झोड उठली आहे.

तुर्भे स्टोअर येथील ठाणे बेलापूर रस्ता अडवून शिवसेना नेते सुरेश कुळकर्णी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करण्यात आली. फटाके फोडून आतषबाजी केल्याचे फोटो-व्हिडीओही समोर आले आहेत. विशेष म्हणजे परिसरातील शेकडो नागरिक आणि पोलिस देखील उपस्थित होते.

सुरेश कुळकर्णी हे नवी मुंबईतील माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती आहेत. कुलकर्णी यांनी महापालिकेत महत्त्वाची पदे भूषवली आहेत. सुरेश कुळकर्णी हे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. नुकताच त्यांनी भाजपाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता.

भाजपाचे नेते गणेश नाईक यांचे ते खंदे समर्थक मानले जात. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले होते. कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची हजेरी लागल्यानंतरच त्यांची राजकीय दिशा ओळखली जात होती.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचा नौटंकी दौरा

उजनीचा पाणी प्रश्न पेटला, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन

चार दिवसानंतर देशातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

५० टक्के लसीकरण झाल्यावरच मुंबईत अनलॉक

कोरोना काळात रात्रीच्या वेळी भररस्त्यात वाढदिवस साजरा करुन देखील त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवली जात असल्याने टीका होत आहे. वाढदिवसाला लोकांच्या गर्दीसह पोलिसांची हजेरी होती, मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलीस दाखवतील का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Exit mobile version