ठाकरे सरकारच्या कारभाराचा त्यांच्याच नेत्यांना वैताग

ठाकरे सरकारच्या कारभाराचा त्यांच्याच नेत्यांना वैताग

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. या परिस्थितीत सत्ताधारी पक्षांचे नेतेच सरकारच्या कारभाराने त्रस्त झालेले दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील अशाच एका नेत्याने थेट राज्य सरकार विरोधात आंदोलन करायचा इशारा दिला आहे. हे नेते म्हणजे शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. राज्याची स्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार पुरते अपयशी ठरले आहे. कुठे ऑक्सिजनची कमतरता आहे, तर कुठे रेमडेसिवीर मिळत नाहीये. या परिस्थितीने राज्यातील सामान्य जनता त्रस्त आहे. विरोधी पक्ष तर या परिस्थितीसाठी राज्य सरकारवर ताशेरे ओढतच होता. पण त्यातच आता राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचीही भर पडू लागली आहे.

हे ही वाचा:

पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबड्या मुख्यमंत्र्यावर कर

…. तर मी कोरोनाचे ‘जंतू’ देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना फक्त वसुलीच कळते

अरे मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात

कोरोनाच्या विळख्यात महाराष्ट्र अडकलेला असताना पुरंदर तालुकाही याला अपवाद नाही. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे हे याच तालुक्यातले. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करताना पुरंदर तालुक्याला डावलले जात असल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे आपण राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. रेमडेसिवीर पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सोमवार, १९ एप्रिल रोजी शिवतारे हे राज्य सरकार विरोधात ठिय्या आंदोलन करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवतारे यांचे हे ठिय्या आंदोलन होणार आहे.

शिवतारे यांचे आंदोलन हे ठाकरे सरकारला मिळालेला घरचा आहेर असल्याचे म्हटले जात आहे. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असून या लाटेत महाराष्ट्र राज्याची जनता ही सर्वाधिक होरपळत आहे. भारतात सापडत असलेल्या कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.

Exit mobile version