काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, असे विधान केले होते. यावर शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही आज कुठे असता असा सवाल त्यांनी केला आहे.
आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, या अशोक चव्हाण यांच्या विधानावर शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता? असा प्रश्न खासदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना विचारला आहे. आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, असा कुणीही गर्व करु नये, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
हे ही वाचा:
मुलीचे लग्नाचे वय १४ हवे; खासदार बर्क यांची बकबक
‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’
मुंबईत काळाबाजारीचे दहा कोटींचे गहू, तांदूळ जप्त
विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर ठाकरे सरकारचा घाला
महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे शंभर टक्के नुकसान होत आहे. आमचा वापर केला जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वरिष्ठांशी बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले. केवळ उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत म्हणून सगळ सहन करत आहोत, असेही हेमंत पाटील यांनी सांगितले.
अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी विधान केले होते की, आम्ही आहोत म्हणून सरकार आहे. आम्ही महत्वाचा पक्ष म्हणून आमचे समर्थन महत्वाचे आहे तसेच मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. तिन्ही पक्ष चांगले काम करत आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले होते.