चिमुरडी लेकरं गमावलेल्या पालकांवर शिवसेना नेत्यांची अरेरावी

चिमुरडी लेकरं गमावलेल्या पालकांवर शिवसेना नेत्यांची अरेरावी

भांडुप येथील मुंबई महापालिकेच्या एका रुग्णालयात चार नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात न्याय मागण्यासाठी या मृत बालकांचे आई वडील हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलनाला बसले होते. यावेळी मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा शिवसेना नेत्या राजुल पटेल या त्याठिकाणी भेटीसाठी आल्या.

पण यावेळी या पालकांचे अश्रू पुसायचे सोडून त्यांनी या पालकांवर अरेरावी केली. तर या संपूर्ण प्रकरणात पालिकेची कोणतीही चुकी नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. उलट या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी पालकांनी स्वीकारली पाहिजे असे धक्कादायक विधान राजुल पटेल यांनी केले. तुम्ही इथे ऍडमिट केले तेव्हा आम्हाला विचारले होते का आम्ही जबाबदारी स्वीकारायला? मग आम्ही कसली जबाबदारी स्वीकारायची? असा अजब सवाल राजुल पटेल यांनी या आंदोलनकर्त्या पालकांना विचारला.

हे ही वाचा:

ओमिक्रोन विरुद्धच्या लढाईसाठी मोदींची ‘पंचसूत्री’

ठाकरेंची एन्ट्री, राणेंचे ‘म्याव म्याव’

लुधियाना जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट

आनंद महिंद्रा म्हणतात, ती जीप मला द्या; मी बोलेरो देतो

भांडुप येथे महापालिकेच्या रुग्णालयात शॉर्टसर्किट झाल्यामुळे चार नवजात बालकांचा मृत्यू झाला या प्रकरणात न्याय मागण्यासाठी या मृत बालकांचे पालक रुग्णालयाच्या बाहेर आंदोलनाला बसले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी करत आहेत. पण या पालकांना महापालिकेशी संबंधित व्यक्तींकडून योग्य दाद मिळत नाहीये. उलट उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

राजुल पटेल यांच्या अरेरावीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. यानंतर त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे. तर राजुल पटेल यांनी माफी मागावी अशी मागणी होताना दिसत आहे.

Exit mobile version