34 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरराजकारणकोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवणूक: शिवसेनेचे इच्छुक राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवणूक: शिवसेनेचे इच्छुक राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल

Google News Follow

Related

महाराष्ट्रात सध्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे भाजपाने या निवडणुकीसाठी सत्यजित कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पण महाविकास आघाडीत मात्र या निवडणुकीला घेऊन नाराजी नाट्य रंगलेले पाहायला मिळतात आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनकडून इच्छुक असलेले राजेश क्षीरसागर हे नाराज झाले असून ते नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर येत आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षासाठी ही जागा रिक्त सोडण्यात आली आहे. २०१९ साली काँग्रेसने ही निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती. तर दुसरीकडे शिवसेनेनेही युतीमध्ये ही जागा लढवली होती. पण आता महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवत असताना काँग्रेसला ही जागा सोडल्यामुळे शिवसेनेतील इच्छुक उमेदवार आणि स्थानिक शिवसैनिक नाराज झाले आहेत. या निर्णयामुळे शिवसेनेत तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे इच्छुक राजेश क्षीरसागर हे कालपासून नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ते बंडखोरी करणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया

एमआयएम शिवसेनेला म्हणते, मला बी जत्रंला येऊ द्या की!

“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून सत्यजित कदम रिंगणात

कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळापत्रक जाहीर केले आहे. १२ एप्रिल रोजी या जागेसाठी मतदान पार पडणारा असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते चंद्रकांत जाधव हे कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. पण कोरोना काळात त्यांचे निधन झाले. तेव्हा ही जागा रिक्त झाली असून त्यासाठी आता पोटनिवडणूक होऊ घातली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा