‘या’ बड्या नेत्याने सोडली शिवसेना, २०१९ मध्ये होता लोकसभेचा उमेदवार

‘या’ बड्या नेत्याने सोडली शिवसेना, २०१९ मध्ये होता लोकसभेचा उमेदवार

राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने पक्षाला राम राम ठोकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत त्यांनी शिवसेना पक्ष सोडला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

नरेंद्र पाटील असे या नेत्याचे नाव असून त्यांनी २०१९ साली शिवसेनेतर्फे सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात. तसेच ते मराठा समाजाचेही नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाटील हे शिवसेनेला घरचा आहेर देत होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि माथाडी कामगारांच्या प्रश्नावरून शिवसेनेवर टीका करत होते.

हे ही वाचा:

बेअब्रु सरकार, रया गेलेले पवार

भाजपाच्या आरोपांना उत्तरे द्या नवाब मलिक, भ्रमिष्टा सारखे बोलू नका

‘पेन ड्राईव्ह’ घेऊन फडणवीस दिल्लीत

आज माथाडी नेते आणि नरेंद्र पाटील यांचे वडील अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेना राज्यात सत्तेत आहे. पण दीड वर्ष झाले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मथडी कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत. त्यांNarच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली असता ती देखील मुख्यमंत्री ठाकरे देत नाहीत. त्यामुळे आपण शिवसेना पक्ष सोडत असल्याचे त्यांनी घोषित केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांचे आणि फडणवीस यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्याचाही शिवसेनेत त्यांना त्रास होतो असे पाटील यांनी म्हटले आहे.

Exit mobile version