अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निधीवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून शिवसेनेच्या वाट्याला कमी निधी आल्याचे बोलून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. यावर महाविकास आघाडीमधील नेत्यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. मात्र आता ठाकरे सरकारला त्यांच्याच नेत्याकडून घराचा आहेर मिळाला आहे. ‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, मात्र प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेते’ असे म्हणत शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
हे ही वाचा:
काश्मीर फाईल्सच्या टीमने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट
पंतप्रधान मोदींची जपानच्या पंतप्रधानांना ‘कृष्ण पंखी’ भेट
आर आर आर चित्रपटाची टीम पोहोचली स्टॅच्यू ऑफ युनिटीला
अगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
या कार्यक्रमादरम्यान बोलताना कीर्तीकर म्हणाले की, “विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. आम्हाला मात्र मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही. कारण मुंबईमध्ये नागरोत्थान आणि नगरविकास विभागाचा निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो ही. मात्र, निधीची पळवापळवी केली जात आहे,” असे ते म्हणाले. त्यावेळीच त्यांनी “आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेते,” म्हणत ठाकरे सरकारला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला. महाविकास आघाडीत अंतर्गत वादही असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा त्रास मुंबईत इतका जाणवत नाही मात्र, ग्रामीण भागात जाणवतो असे गजानन किर्तीकर म्हणाले.