शिवसेनेला घरचा आहेर…’या’ नेत्याने व्यक्त केली मुख्यमंत्र्यांबद्दल निराशा

शिवसेनेला घरचा आहेर…’या’ नेत्याने व्यक्त केली मुख्यमंत्र्यांबद्दल निराशा

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रोज चांगलेच गाजत आहे. विरोधीपक्षाचे नेते रोज नवनवीन मुद्द्यांवरून सरकारला घेरत आहेत. विरोधकांच्या आरोपांना आणि प्रश्नांना तोंड देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची चांगलीच तारांबळ उडालेली दिसत आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर मिळताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनचेच एक नेते मुख्यमंत्री ठाकरे आणि मविआ सरकारबद्दल निराशा व्यक्त करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची तारीफ करत आहेत.

शिवसेना नेते नरेंद्र पाटील हे सध्या स्वपक्षा विरोधातच आक्रमक झालेले दिसत आहेत. नरेंद्र पाटील हे मराठा समाजाचे नेते असून ते सरकारच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. गेले काही दिवस नरेंद्र पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.

“माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी खंबीर पाठींबा दिला होता. पण मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मराठा आरक्षण व इतर समांतर योजना तसेच MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नेमणुकी बद्दल काहीच भूमिका मांडली नाही.” असे ट्विट नरेंद्र पाटील यांनी बुधवारी केले होते.

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून ट्विट केले आहे.

आपल्या आणखीन एका ट्विट मध्ये पाटील यांनी महाराष्ट्र सरकारच्या मराठा आरक्षणाच्या धोरणावर टीका केली आहे.

Exit mobile version