१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत

१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत

राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही भाजपने आपली यशस्वी रणनीती दाखवत महाविकास आघाडीला मोठा दणका दिला आहे. त्यात आता महाविकास आघाडीमधली अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे १३ आमदारांसह गुजरातमध्ये दाखल झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांचा फोन नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत असून शिवसेनेत फूट पडणार का या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. तर त्यांच्यासोबत १३ आमदार आहेत. मात्र, हे १३ आमदार कोण हे अजून अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकनाथ शिंदे असलेल्या हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकार कोसळणार का? अशाही चर्चांना उधाण आले आहे.

हे ही वाचा:

“पराभवानंतर सरकार म्हणून विचार करण्याची गरज”

“महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल”

राहुल गांधींची ईडीकडून पाचव्यांदा होणार चौकशी

विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने दिला महाविकास आघाडीला धोबीपछाड; पाचही उमेदवार विजयी

एकनाथ शिंदे हे आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे शिवसेनेच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू असून आमदार आणि खासदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीची सर्व सूत्रे आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हाती घेतली आहेत.

Exit mobile version