27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारण.... तर मी कोरोनाचे 'जंतू' देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते

…. तर मी कोरोनाचे ‘जंतू’ देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते

Google News Follow

Related

मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला. ते शनिवारी बुलढाण्यात बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. भरसभेत संजय गायकवाड यांची जीभ घसरली. त्यामुळे आता यावरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार  उडाला आहे. मात्र मात्र विरोधी पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे, असा आरोप बुलढाणा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांच्यावर टीका केली.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, कुंभमेळ्याविषयी महत्वाचा निर्णय

ठाकरे सरकारची रेमडेसिवीरच्या किंमतीसाठी घासाघीस

मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी

गुजरातचे पत्र दाखवता, मग महाराष्ट्राचे का लपवता?

जर का माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असे आवाहनही त्यांनी भाजपाला केलं आहे. तसेच कोरोनाचें जंतू जर मला मिळाले असते तर देवेंद्रच्या तोंडात कोंबले असते. अशी टीका ही त्यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा