महाराष्ट्राने लसीकरणासाठी केरळ पॅटर्न वापरावा असा सल्ला शिवसेनेच्याच एका नेत्याने ठाकरे सरकारला दिला आहे. लसीकरणावरून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न असलेल्या ठाकरे सरकाराला हा घरचा आहेर मानला जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्याच नेत्यांना महाराष्ट्र सरकारची कामाची पद्धत चुकीची वाटत असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्राचे ठाकरे सरकार कोविड महामारी हाताळणीत अनेक बाबतीत अपयशी होताना दिसत आहे. लसीकरण मोहीम राबवण्याच्या बाबतीत पण सरकारची नियोजनशुन्यता दिसून येत आहे. म्हणूनच मंगळवार, ११ मे रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील १८-४४ वयोगटातल्या नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली. तर त्याचवेळी दुसरीकडे राज्याचे माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी महाराष्ट्राने लसीकरणाच्या बाबतीत केरळ पॅटर्न राबवावा असे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे.
हे ही वाचा:
सचिन वझेची अखेर पोलिस दलातून हकालपट्टी
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीसांचा सवाल
अनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?
मुख्यमंत्री महोदय, २ मिनिटांत २ परस्पर विरोधी भूमिका कशा मांडता?
केरळ सरकारने लसीकरण प्रभावी पद्धतीने करण्यासाठी नियोजनबद्ध काम केले. लस वाया जाणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. लसीच्या एका कुपीतून दहा जणांना लस दिली जाऊ शकते. म्हणून केरळमध्ये लसीकरण केंद्रावर तेवढ्या व्यक्ती असल्याशिवाय लसीची कुपी उघडली जात नाही. त्यामुळे लस वाया जाण्याचे प्रमाण कमी होते असे सावंत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या पत्रातून सावंतांनी एकप्रकारे महाराष्ट्र सरकारच्या नियोजनशुन्यतेवरच बोट ठेवले आहे. तसेच महाराष्ट्रात लसींचे डोस खुप मोठ्या प्रमाणात वाया जातात याकडेही सावंतांनी रोख केला आहे.