गेले दोन दिवस महाराष्ट्रातील काही भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित हिंसाचाराच्या घटनेवरून महाराष्ट्रात मुसलमान समाज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला. पण अनेक ठिकाणी या जमावाने हिंसक वळण घेतले. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून अनेक व्हिडीओ पुढे आले असून यामध्ये शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचादेखील एक व्हिडिओ समोर आला आहे.
शुक्रवार, १२ नोव्हेंबर रोजी त्यांनी राज्यातील अनेक भागात मुस्लिम समाजाने आंदोलनाची आणि जिल्हा बंदची हाक दिली होती. पण या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि जमावाने पोलिसांवर आणि सामान्य दुकानदारांवर दगडफेक केली. या सर्व हिंसाचाराचा निषेध संपूर्ण राज्यातून होत असतानाच समाज माध्यमातून काही व्हिडीओ पुढे आले आहेत.
हे ही वाचा:
दुबळ्या राज्यकर्त्यांमुळे दंगेखोरांचे मनोधैर्य वाढले
आता एसटी कर्मचारी ठोठावणार अनिल परब यांचे दार
सलमान खुर्शीद यांना, हिंदुत्वावर बरळल्यानंतर घरचा आहेर
यामध्ये राज्याचे माजी मंत्री अंडी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. अर्जुन खोतकर यांनी मुल्सिम समुदायासमोर भाषण करताना हिंदू मुसलमानांमध्ये फूट पडणारे केंद्रात सत्तेत बसले आहेत असे म्हटले आहे. तर “जिथे कुराण जाळले जाईल, मशीद तोडली जाईल, भगवदगीता मोडली जाईल तिथे त्या विरोधात आपण लढू. आम्ही तुमच्या सोबत आहोत. या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत. इन्शाह अल्लाह काहीही झाले तरी आम्ही तुमच्या सोबत राहू.” असे अर्जुन खोतकर या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.
लीगल राईट्स ऑबझर्व्हेटरी या सामाजिक संस्थेने हा व्हिडीओ ट्विट केला असून अर्जुन खोतकर यांनी आंदोलकांना भडकवले का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तर हे नवे हिंदुत्व आहे का? अर्जुन खोतकर याचे स्पष्टीकरण देणार का? असेही त्यांनी विचारले आहे.
क्या शिवसेना नेता अर्जुन खोतकर @miarjunkhotkar ने त्रिपुरा विरोधी रैली में मुस्लिम दंगाइयों को हिंसा के लिए उकसाया? क्या वह इसपर स्पष्टीकरण देंगे?
यह नया हिंदुत्व है? @mieknathshinde @NiteshNRane @Dev_Fadnavis @GopichandP_MLC @KiritSomaiya @priyankac19 pic.twitter.com/qcBYw0G0VG— Legal Rights Observatory- LRO (@LegalLro) November 13, 2021