स्टॅण्ड अप कॉमेडीच्या नावाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुल्लेखाने टिंगल आणि बदनामी केल्याचे प्रकरण स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या चांगलेच अंगलट आले आहे. एका हॉटेलमधील स्टुडिओत त्याने केलेल्या या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचे थेट नाव न घेता शेलक्या भाषेत गाणे सादर केले. तो व्हीडिओ खासदार संजय राऊत यांनी शेअर करत कामराचे कौतुक केले. त्यानंतर शिवसैनिकांनी हा स्टुडिओ असलेल्या द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेलमध्ये तोडफोड केली.
शिवसेना नेता संजय निरुपम यांनी कॉमेडियन कुणाल कामराला धमकी दिली आहे. २४ मार्चच्या सकाळी ११ वाजता कुणाल कामराला चोपणार असल्याचा इशारा निरुपम यांनी एक्स द्वारे पोस्ट करत दिला आहे.
हे ही वाचा:
समीर वानखेडे यांची एण्ट्री सालियन प्रकरणाला देणार नवे वळण
निवडून न येणारे विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात!
‘कीड़ा जडी’ – अनेक रोगांवर प्रभावी, किंमत ऐकून व्हाल थक्क!
“जर मार बसला, तर फक्त चांगल्या चेंडूवरच बसावा” – कुणाल पांड्या
कुणाल कामरा याने या गाण्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले. एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनपर गाणे कॉमेडियन कुणाल कामरा याने रचले होते.
त्यानंतर राहुल कनाल यांच्यासह शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी ‘द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेल’मध्ये घुसत स्टुडिओची तोडफोड केली.
याप्रकरणी शिंदेच्या शिवसैनिकांवर गुन्हा देखील दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हॉटेलची तोडफोड याअगोदर देखील अनेकदा झाली आहे, त्यामुळे असे शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कळते.
या तोडफोडी प्रकरणी शिवसेना नेते कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुणाल कामराच्या स्टुडिओमध्ये तोडफोड केल्यानंतर कुणाल सरमळकरला पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले.
संजय राऊत यांनी शेअर केली होती पोस्ट
उद्धव ठाकरेंची शिवसेना या गाण्यावरुन कुणालच कौतुक करताना दिसत असून शिंदे गटाला डिवचण्याची संधी त्यांनी साधली. संजय राऊत यांनी कुणालचे हे गाणे पोस्ट करत ‘कुणाल का कमाल!’ जय महाराष्ट्र! असे म्हटले आहे.