आयुक्तांचे आदेश धुडकावत सेनेची पोस्टरबाजी

आयुक्तांचे आदेश धुडकावत सेनेची पोस्टरबाजी

महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्राबाहेर राजकीय पोस्टर्स लावता येणार नाहीत, असा आदेश मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिलेला आहे. परंतु सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे नेते आयुक्तांचे आदेश पायदळी तुडवताना दिसत आहेत.

भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी सांगितले की, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारचे परिवहन मंत्री अनिल परब मंगळवारी विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. या आशयाचे फलक आता पार्ल्यामध्ये दिसत आहेत. अधिक बोलताना पांडे म्हणाले की, हे पालिका आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहे.

हे ही वाचा:

सरकारी कर्मचारी सरकारविरुद्ध आंदोलनाच्या तयारीत

सोनियांच्या प्रभावामुळे शिवसेना राज्यात फॅसिझम राबवतेय काय?

एकनाथ शिंदेंविरोधात ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्याला अटक

शिवसेना आमदाराच्या स्टंटबाजीमुळे कंत्राटदाराचा जीव धोक्यात?

महापालिका आयुक्तांनी स्पष्टपणे सांगूनही लसीकरण केंद्राबाहेर राजकीय पोस्टर्स लावण्यात आली आहेत. भाजप नेते म्हणाले की सत्तेत असलेल्यांसाठी महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्था व नियम नाहीत? असे असेल तर मग आता इक्बालसिंग चहल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाई करणार का?

मुंबईतील बहुसंख्य लसीकरण केंद्रांवर राजकीय पक्षांच्या होर्डिंग्जवर बंदी घालण्याचे आदेश पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले होते. शहरामध्ये सध्याच्या घडीला एकूण ३४४ लसीकरण केंद्रे आहेत. त्यापैकी २४५ केंद्रे ही महापालिकेची आहेत. तसेच इतर २० लसीकरण केंद्रे आणि राज्य सरकारची आहेत.

एखाद्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने होर्डिंग्ज काढले नाहीत तर, स्थानिक प्रशासनाला होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चहल यांनी सर्व प्रभाग अधिका-यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, लसीकरण केंद्रांवर राजकारण्यांच्या होर्डिंग्जबाबत अनेकदा तक्रारी आल्या आहेत. या आदेशात असेही म्हटले आहे की, नगरसेवक व आमदार यासारखे अनेक लोकप्रतिनिधी सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये रस दाखवत आहेत. त्यामुळेच लसीकरण मोहीमेत नागरिकांचा सहभागही वाढला आहे. अनेक केंद्रांवर बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज दिसून येत आहेत. असे पोस्टर्स होर्डिंग्ज काढायला हवेत.

Exit mobile version