31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणपराभवाच्या भीतीने शिवसेनेला हुडहुडी भरली

पराभवाच्या भीतीने शिवसेनेला हुडहुडी भरली

Google News Follow

Related

मुंबई महानगरपालिकेने वार्डची संख्या ९ ने वाढवून २३६ वर नेण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. “मुंबई महापालिकेत ९ वॉर्ड वाढवण्याचा अध्यादेश ठाकरे सरकारने काढला आहे. कारण स्पष्ट आहे, पराभवाच्या भीतीने शिवसेनेला हुडहुडी भरली आहे.” असं ट्विट अतुल भातखळकरांनी केलं आहे.

“मुंबई महानगरपालिकेचे वॉर्ड वाढवण्याचा अध्यादेश राज्य सरकार काढणार, शिवसेना घाबरलेली आहे. त्यामुळेच हे उद्योग चालू आहेत. पण मुख्यमंत्री जी, काहीही करा, येणार तर मुंबईत भाजपाच. वॉर्डची पुनर्रचना मनासारखी होत नाही, निवडणूक आयोग ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर आज तुम्ही हा निर्णय घेतलात. पण अशा कितीही गोष्टी केल्यात, काहीही केलंत तरी सुद्धा भाजापाच मुंबईत निवडून येणार. कारण मुंबईकर जनता, तुमचं खरं स्वरूप आता ती ओळखून चुकली आहे. भ्रष्टाचाराचा आणि अकार्यक्षमतेचा तुमचा हा राक्षस, या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईकर जनता काढल्याशिवाय राहणार नाही.” असंही भातखळकर म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

महानगरपालिकेत आता २२७ ऐवजी २३६ वॉर्ड

२६ नोव्हेंबरपासून पुन्हा दिल्लीत ट्रॅक्टर रॅली?

अनियंत्रित परदेशी देणग्यांचा वापर राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये

रियाझ भाटी म्हणतो, मी राष्ट्रवादीचाच

त्याचबरोबर भाजपा नेते आणि मुंबई महानगरपालिकेचे भाजपा नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनीही एक व्हिडिओच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “मुंबई महानगरपालिकेमध्ये २२७ वरून २३६ करणार. फक्त नऊच नगरसेवक का वाढले? याला काही लोकसंख्येचा आधार आहे? जनगणनेचा आधार आहे? केवळ राजकीय सोईसाठी, तोंडावर आलेली निवडणूक पुढे ढकलण्यासाठी नगरसेवकांची संख्या बदलण्याचा निर्णय महविकास आघाडीतील शिवसेनेने घेतलेला आहे. मंत्रिमंडळात हा निर्णय यापूर्वीही झाला असता, सर्व महानगर पालिकांमध्ये १५% जागा वाढवल्या त्यावेळी मुंबई महानगर पालिकेत जागा वाढल्या नाहीत. आत्ता त्यांच्या लक्षात आलं, प्रभाग रचनेत गडबड करून, आपण ही निवडणूक जिंकू का? तर तो डाव यशस्वी होणार नाही, हे लक्षात आल्यावर आता प्रभागाची संख्याच ९ ने वाढवावी, म्हणजे प्रभागाची फेररचना करून आपल्याला मोकळं रान मिळेल, केवळ राजकीय हेतूने, ९ ने संख्या वाढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने आणि शिवसेनेने घेतलेला आहे. हे निवडणुकीला घाबरलेले आहेत.” असं शिरसाट म्हणाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा