‘कोळी समाजाला हद्दपार करण्याचे शिवसेनेचे कारस्थान’

‘कोळी समाजाला हद्दपार करण्याचे शिवसेनेचे कारस्थान’

आमदार अतुल भातखळकर यांनी केला हल्लाबोल

ठिकठिकाणचे मासळी बाजार उठविण्याचे, हलविण्याचे एक कारस्थान शिवसेनेने आखले आहे. ज्या मराठी माणसाच्या, कोळी समाजाच्या भरवशावर शिवसेनेने राजकारण केले, सत्तेत बसले. त्यांच्या नेत्यांनी स्वतःची घरे भरली, आज तोच कोळी समाज आणि मराठी माणूस त्यांना नको आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

दादर येथील मासळी बाजार बुलडोझर लावून उद्ध्वस्त केल्यानंतर कोळी समाजात प्रचंड रोष आहे. या कोळी बांधवांना मुंबईतून लांब हलविण्यात येत आहे. कोळी समाजाच्या या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी आणि कोळी समाजाला हद्दपार करण्याच्या ठाकरे सरकारच्या कारस्थानाविरुद्ध भाजपाच्या मच्छिमार सेलच्या पुढाकाराने दादर येथे मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर खरमरीत टीका केली. कोळी समाजाच्या मागे भाजपा भक्कमपणे उभा आहे, असा निर्धारही आमदार भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले की, कोळी बांधवांवर संपूर्ण मुंबईत अन्याय होतो आहे. सगळ्या कोळीवाड्यांत तोडकाम चालू आहे. वरळीचा कोळीवाडा असो की मालाड पश्चिमचा सगळीकडे कोळी समाजाची हीच स्थिती आहे. कारण आता बिल्डिंगवाले म्हणत आहेत की, आम्हाला या मासळीचा वास येतो. त्यांना जर मासळीचा वास येत असेल तर बिल्डिंग सोडून जा. ही मुंबई जर कुणाची असेल तर ती कोळी-आगरी यांची मुंबई आहे, मराठी माणसाची मुंबई आहे. या मुंबईतल्या भूमिपुत्रांना तुम्ही हात लावण्याचा प्रयत्न केलात तर भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही.

हे ही वाचा:

अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती

ऐन गणेशोत्सवात पीओपी मूर्तींवर बंदी?

द एम्पायर या वेबसिरीजवर त्वरित बंदी घाला

या हल्ल्याचा बदला घेऊ

आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत दादरच्या मीनाताई ठाकरे मासळी मंडई येथे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोळी बंधू भगिनींनीही ठाकरे सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

Exit mobile version