केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. जनतेच्या आक्रोशाने शिवसेना हादरली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा जळफळाट सुरू झाला आहे, असा घणाघाती हल्ला नारायण राणे यांनी चढवला आहे. “जनता आता समोर येऊन राग व्यक्त करु लागल्यामुळे शिवसेना हादरुन गेली व त्यामुळेच सामना मध्ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्द होते.” असं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे.
जनता आता समोर येऊन राग व्यक्त करु लागल्यामुळे शिवसेना हादरुन गेली व त्यामुळेच सामना मध्ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्द होते.
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 27, 2021
नारायण राणे यांनी ट्विट करून शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर टीका करण्यात आली आहे. त्याला राणेंनी ट्विटमधून उत्तर दिलं आहे. जनता आता समोर येऊन राग व्यक्त करू लागल्यामुळे शिवसेना हादरून गेली आहे. त्यामुळेच सामनामध्ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहीत जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरून सिध्द होते, असं सांगतानाच लोकांच्याteam संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करून घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू, असा टोला राणेंनी लगावला आहे.
हे ही वाचा:
पुन्हा एकदा मोदी हटाओचे अपयशी प्रयत्न सुरु
आसाम-मिझोराम सीमासंघर्षाला हिंसक वळण
महिला भिकारणीला फेकले स्कायवॉकवरून
२६ जुलैनंतर १६ वर्षे तीच स्थिती
“लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू.” असंही ट्विट नारायण राणेंनी केलं आहे.