“शिवसेना हा नाच्यांचाच पक्ष झालेला आहे.” या शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केलेल्या तथाकथित वक्तव्यामुळे वाद निर्माण केला गेला आहे. हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. नरिमन पॉईंट येथील भाजपा कार्यालयासमोर मध्यरात्री काही अज्ञातांनी आक्षेपार्ह पोस्टर लावले आहेत. हे पोस्टर नेमके कोणी लावले, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. याच विषयावर नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
@ShivSena pic.twitter.com/6Q7G2JSPqp
— nitesh rane (@NiteshNRane) December 12, 2021
“मुंबईच्या महापौर किशोरीताईंबद्दल जे आमच्या आशिष शेलारजींनी म्हंटलंच नाही, त्याबद्दल शिवसेनेला जास्तच मर्दानगी सुचलेली आहे. रात्रीच्या वेळी यायचं आणि आमच्या भाजपा कार्यालयासमोर बॅनर लावायचा. आणि स्वतःला वाघ म्हणून म्यावम्याव करायचं. ही आता नवीन शिवसेना झालेली आहे. नाच्यांचाच पक्ष उरलेला आहे हा. ज्याच्यामध्ये, वरपासून खालपर्यंत सगळे नाचेच आहेत. यांनी दुसऱ्यांना नाच्या म्हणण्यापेक्षा, पुढच्यावेळी बॅनर लावत असताना जरा जे बॅनर लावणारे आहेत यांची नावं खालती लिहिली असती, तर नाच्या कशाला म्हणतात हे आम्हीही त्यांना दाखवून दिलं असतं.” असं नितेश राणे म्हणाले.
हे ही वाचा:
मुंबईत १४४ ‘कलम’; एमआयएमच्या सभेला गर्दी
‘म्हाडा’ ची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा संताप
‘ओबीसी आरक्षण संपवण्याचा ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा डाव उघड’
…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?
या पोस्टवर आशिष शेलार यांच्या फोटोचे विडंबन करण्यात आले आहे. त्याशिवाय, एका गाण्याचे विडंबन करण्यात आले आहे. कसं काय शेलार बरं हाय का? असे विचारत काल तुम्ही किशोरी ताईंचा अपमान केला म्हणे, असं विचारत शेलार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करण्यात आली आहे. भाजपा कार्यालयासमोरच थेट अशा प्रकारची पोस्टरबाजी करण्यात आल्याने याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.